घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं दाम्पत्याला प्राण गमवावे लागले. बुधवारी (13 फेब्रुवारी) पुण्यातील बिबेवाडी परिसरात ही घटना घडली. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं विषारी वायूनं मृत्यू झाला.
पेस्ट कंट्रोलमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. घरातील डास, कीटक घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल केले. पण त्यात दाम्पत्याचाच जिव गेला. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी ही घटना घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मयतांची नावे आहेत. घरात पेस्ट केल्यानंतर त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. घराची दारे आणि खिडक्या बंदच ठेवल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
