राधे माँला कोणत्याही क्षणी अटक

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

आता राधे माँ ला वरच्या कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. मात्र तूर्तास तरी राधे माँला कोणत्याही क्षणी अटक करण्यात येण्याची शक्यता आहे.

राधे माँ च्या विरोधात कांदीवली पोलीस स्टेशनमध्ये निकी गुप्ता यांनी हुंडा मागितल्या प्रकरणी तक्रार दाखल केलीये. राधे माँ च्या सांगण्य़ावरुनच पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचं निकीनं या तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी राधे माँसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे राधे माँच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

वादग्रस्त राधे माँचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी एक प्रश्नावली तयार केलीय. यात
निधी गुप्ता कुटुंबाला केव्हापासून ओळखता?
निधी गुप्ता यांना मारहणा केली होती का?
निधीने केलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का?
तुम्ही विमानाची मागणी केली होती का? आदी प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *