राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर देण्यात आली आहे.यापुढे राज्यातील शिक्षक, तसचं शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार महिन्याच्या पहिल्याच तारखेला जमा होणार आहे. तसं परिपत्रकही शिक्षण विभागानं जारी केलं आहे.
शिवाय शिक्षक वा कर्मचाऱ्यांचा पगार 1 तारखेला न झाल्यास मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेतही शिक्षण खात्यानं दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांनी ही मागणी लावून धरली होती.

