रेल्वे रुळ उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला

रेल्वे रुळ उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी आसामच्या कोक्राझर जिल्ह्यात रेल्वे रुळ उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट लष्कर आणि पोलिसांनी उधळून लावला.

कोक्राझोर आणि गुवाहाटी रेल्वे स्थानकादरम्यान आयईडीच्या सहाय्याने रेल्वे रुळ उडवण्याचा कट कामतपूर लिबरेशन संघटनेच्या दहशतवाद्यांनी रचला होता.

मात्र हा कट लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत उधळून लावला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत संघटनेचा एक दहशतवाद्याला कंठस्नान घेलण्यात आले.

या ठिकाणाहून सात किलो आयईडी, ७.६ मिमी पिस्तोल, पिस्तोल मॅगॅझिन, दोन हँड ग्रेनेड आणि डेटोनेटर्स हस्तगत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *