रोबोचा हात कामगाराच्या शरीराच्या आरपार घुसला, हरियाणात कामगाराचा मृत्यू

रोबोचा हात कामगाराच्या शरीराच्या आरपार घुसला, हरियाणात कामगाराचा मृत्यू

सध्याच्या युगात अवघड कामं ही रोबोमुळे सोपी झाली आहेत. मात्र याच रोबोमुळे एका कामगाराला जीव गमवावा लागला. हरियाणातील गुडगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. रोबोमुळे एखाद्याचा मृत्यू होण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.

मनेसरच्या इंडस्ट्रियल मॉडेल टाऊनशिपमध्ये एसकेएच मेटल्स ही कंपनी आहे. वाहनांना लागणारं साहित्य ही कंपनी बनवते. या कंपनीत मेटल शीट कापण्याचं काम हे रोबोमार्फत होतं. या रोबोच्या भोवती ठराविक अंतरापर्यंत जायला मनाई असते. पण रामजी लाल हा कर्मचारी काम करताना रोबो असलेल्या भागात गेला होता. त्यामुळे रोबोटिक आर्म त्याच्या शरीराच्या आरपार गेला आणि त्यामुळे रोबोने त्याला मेटल शीट्सवर फेकले. रामजीला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *