निखिल मरळ हा माणूस पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिपाई आहे. काही दिवसांपूर्वी तो खडकवासला परिसरात फिरायला गेला, तिथे त्याची एका विवाहित महिलेशी ओळख झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पैशांची चणचण भासू लागल्याने घरफोड्या करायला सुरुवात केली.
त्यानंतर सोन्याच्या दागिने घालून मिरवणं, पार्टी देणं चालू झालं. याची कुणकुण पोलिसांना लागली आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झाला.
आरोपीने सिंहगड रोड परिसरातील एका घरात घुसून साडेदहा लाख रुपयांची लूट केली होती. विशेष म्हणजे घरफोडी केल्यानंतर निखिल हे दगिने अंगावर घालून फिरत होता. शिवाय मित्रांना पार्टी देऊन पैशांची उधळपट्टी करत होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
दरम्यान, आरोपीने त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने सिंहगड रोड भागात आणखी दोन घरफोड्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिस त्याच्या मैत्रीणीचा शोध घेत आहेत.

