लग्नानंतरच्या नात्यामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या बरोबरीने शरीरसंबंध सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये शरीरसंबंध व्यवस्थित नसतील तर, नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. काही वेळा प्रकरण घटस्फोटापर्यंतही पोहोचते. अहमदाबादमध्ये याच मुद्दावरुन पत्नीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
बायकोने शरीरसुखाची मागणी केली म्हणून चिडलेल्या नवऱ्याने पत्नीला जबर मारहाण केली. जेव्हा, या विषयाबद्दल तिच्या सासू-सासऱ्यांना समजले तेव्हा, त्यांनी सुद्धा तिला मारहाण केली. या प्रकरणी अहमदाबादच्या महिला पोलीस ठाण्यात पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तक्रारदार महिला डॅनिलिम्डा भागात राहायला असून, तिचे १४ मे २०१६ रोजी सारखेज भागातील तरुणाबरोबर लग्न झाले. सुरुवातीला नवरा तिच्याबरोबर चांगला वागायचा. पण २०१८ मध्ये तिने मुलाला जन्म दिल्यानंतर नवऱ्याचे तिच्याबरोबरचे वागणे बदलले असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
नवऱ्याने शरीरसंबंध ठेवणे का बंद केले?
मागच्या काही महिन्यांपासून नवऱ्याने माझ्याबरोबर शारीरिकसंबंध ठेवणे बंद केले. “जेव्हा, कधी मी त्याच्याकडे शरीरसुखाची मागणी करायचे, तेव्हा तो चिडून मला मारहाण करायचा” असे महिलेने सांगितले. महिलेने नवऱ्याकडे शरीरसुखाचा आग्रह धरल्यानंतर तो घर सोडून निघून गेला. त्यामुळे सासू-सासऱ्यांनी माझा छळ सुरु केला, ते मला मारहाण करायचे. माझ्यामुळे नवरा घर सोडून गेला असे सासू-सासरे मला सतत सुनावायचे असे महिलेने तिच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
नवऱ्याने अनेकाकंडून पैसे घेतले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता. माझ्याकडे आणि मुलाकडेही लक्ष देणे त्याने बंद केले होते असे महिलेने पोलिसांना सांगितले. काही महिन्यांपूर्वी मुलगा आजारी होती. त्यावेळी सुद्धा नवऱ्याने उपचारासाठी पैसे दिले नाही असे महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. महिलेने सोमवारी पोलीस ठाणे गाठून पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली. आरोपींना अजून अटक करण्यात आलेली नाही.
