शिराळा तालुक्यात सोळा वर्षात नऊ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी चांदोली उद्यानात दोन आणि उद्यानाच्या बाहेर सात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्यांचा मुक्तसंचार शेतकऱ्यांना शेतात जाताना धडकी भरणारा आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट आहेत मात्र त्यातील काही बिबटयांनी जंगला शेजारच्या ऊस शेतात आणि डोंगरात आश्रय घेतला आहे. तर जंगल सोडून बाहेर राहणारी एक बिबट्याची प्रजाती तयार झाली आहे. जंगलाबाहेर राहणाऱ्या बिबट्यांना उपयुक्त पुरेसे भक्ष्य मिळत नाही. तसेच अपघात, ह्रदयविकार आणि विषबाधा यामुळे बिबट्यांचा मृत्यू झाले आहेत. तर दुसरीकडे जंगलाबाहेर आलेल्या, बिबट्यांच्या कडून पाळीव प्राण्यांना सुद्धा लक्ष्य बनवले जात आहे.
चांदोली अभयारण्य अर्थात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या जंगल क्षेत्रात बिबटे आढळतात. मात्र बिबट्यांची संख्या वाढली की नवीन बिबटे बाहेर स्थलांतरित झाले आहेत. मुळात चांदोली अभयारण्यात या बिबट्यांना मुबलक पाणी आणि भक्ष अर्थात त्यांचा अन्न व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जंगलात बिबट्यांची संख्या जास्त झाली तर टेरेटरे अर्थात जुने बिबटे नव्या बिबट्यांना राहू देत नाहीत किंवा अधिक बिबटे एकत्र राहू शकत नाहीत त्यामुळे त्यांचे स्थलांतर होत असत.
जंगलातून बाहेर पडल्याने त्यांच्या बछडयांचा जन्म शेतात आणि डोंगरकपारीत होतो. त्यामुळे त्यांना जंगल माहीत नसल्याने उद्याना बाहेर परिसर हेच त्यांचे आश्रयस्थान बनू लागल आहे. त्यामुळे त्यांचा वावर चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत सुद्धा होत आहे. अन्नाच्या शोधात फिरत असताना त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांना सुद्धा लक्ष बनवले जात आहे.
