राधे माँचा बँक बॅलन्स

राधे माँचा बँक बॅलन्स

माझ्याकडे पुरेसा बँक बॅलन्स नाही. माझ्याकडे केवळ ८ ते १० लाख रुपये आहे. माझी सीबीआय चौकशी करा, त्यांनी माझ्याकडे काही सापडणार नाही,  असे राधे माँने मुलाखतीत सांगितले.

मिनी स्कर्टचे फोटो कोणी लिक केले, असे विचारल्यावर राधे माँ म्हणाली, माझी प्रतिमा ज्यांना खराब करायची आहे, त्यांनी हे काम केले आहे. मीडियामध्ये जाणूनबुजून मिनी ड्रेसचे फोटो पसरविण्यात आले आहेत. ते माझे वैयक्तिक फोटो आहेत. मीडियाला ते प्रसिद्ध करण्याचा कोणताही अधिका नाही. त्यांच्या या वागणुकीने माझ्या त्यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे तिने सांगितले.

हुंड्यासाठी छळ करण्याचा आरोप करणारी निक्की मेहता हिला आपण ओळखत नसल्याचे राधे माँने सांगितले.

माझ्या मेकअप करण्यात काही चुकीचे नाही. हा मेकअप दुर्गेप्रमाणे नाही. मला तुम्ही पाहता ते माझ्या भक्तांनी मला परिधान केले असते. असेही ती म्हणाली.

भक्त का उचलून घेतात, या प्रश्नावर ती म्हणाली, मी एकदा थकल्यावर माझ्या मुलाने उचलून घेतले होते. प्रवचन केल्यावर माँ थकून जाते. असेही तीने सांगितले.

राधे माँने असेही सांगितले की, कुंभ मेळ्यात भाग घेण्यात माझ्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *