मोदींच्या स्वागतासाठी 48 हजार भारतीय नागरिकांनी केली नोंदणी

मोदींच्या स्वागतासाठी 48 हजार भारतीय नागरिकांनी केली नोंदणी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता. 16) दोन दिवसांसाठी दुबई दौऱयावर आहेत. मोदींच्या स्वागतासाठी 48 हजार भारतीय नागरिकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती दिली.

नरेंद्र मोदी हे 16 व 17 ऑगस्ट रोजी दुबई दौऱयावर आहेत. येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर सोमवारी सभा आयोजित केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक उपस्थित राहणार आहेत. सभेस उपस्थित राहण्यासाठी नोंदणी सुरू आहे. आजपर्यंत 48 हजार भारतीय नागरिकांनी नोंदणी केली आहे, असे वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे.

संयोजन समितीचे सदस्य बी. आर. शेट्टी यांनी सांगितले की, ‘मोदींच्या स्वागतासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. www.namoindubai.ae या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी सुरू आहे. मैदानावर 30 हजार नागरिकांची बसण्याची क्षमता आहे. परंतु, नागरिकांच्या प्रतिसादामुळे जागा वाढविण्यात येणार आहे. उपस्थितांना मोफत पाणी व अन्नाची व्यवस्था करण्यात येणार आहे.‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *