नागपुरातील जनजीवन विस्कळीत

गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसाने नागपुरातील जनजीवन काही का‍ळाकरिता विस्कळीत झाले होते. बुधवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी पहाटे चांगलाच जोर धरला सकाळी ९ वाजेपर्यंत शहर तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. या पावसामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला

शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. मान्सूनच्या दृष्टीकोनातून तयारी पूर्ण झाल्याचे मनपाचे दावे फोल ठरले. शहरातील शंकर, कॉफी हाऊस चौक, पडोळे चौक, जगनाडे चौक सारख्या महत्त्वाच्या चौकात पाण्याचे जणू तळेच साचले होते. बेसा, सादिकनगर तसेच पिवळी नदी जवळील परिसरातील वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. मनपाचा अग्निशमन विभागाची पळता भुई थोडी झाली.

दुपारनंतर सूर्यदर्शन

सकाळी ९ नंतर पावसाचा जोर कमी झाला. परंतु परत ११ ते १२ या दरम्यान शहरातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस झाला. परंतु त्य़ानंतर हळूहळू पाऊस ओसरला. दुपारी २ नंतर सूर्यनारायणाने दर्शन दिल्यानंतर जनजीवन सामान्य झाले. परंतु येत्या २४ तासांमध्ये परत एकदा जमदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *