कात्रज पोलिस चौकीजवळ साडे चार वर्षांची एक चिमुरडी सापडली आहे. विशेष म्हणजे तिची आईच तिला सोडून गेल्याची माहिती आहे.
बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही मुलगी सापडली. तिचं नाव वंदना दत्ता माने तर आईचं नाव स्वाती असल्याचं ती सांगते. तिच्या कंबरेच्या बेल्टवर क्राईस चर्च स्कूल, मुंबई असं लिहिलं आहे.
कात्रज डेपोजवळ संबंधित महिलेने अन्य एका महिलेकडे या मुलीला सोडवले. ‘मी लगेच आले’ असं सांगून ती गेली, परंतु परत आली नाही. त्यामुळे ज्या महिलेकडे चिमुरडीला सोपवलं होतं तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
कात्रज पोलिस वंदनाच्या आईचा शोध घेत आहेत. मुलीबद्दल माहिती मिळाल्यास कात्रज पोलिस चौकीच्या 020 2431 7770 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे.

