प्रसिद्ध बिल्डर आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या एका मोठ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टला मुख्यमंत्र्यांनीच चाप लावला आहे. प्रकल्पाला दिलेल्या काही सवलती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रद्द केल्या आहेत.
डोंबिवलीजवळ पलावा हा लोढांचा भव्य प्रोजेक्ट उभा राहत आहे. या प्रोजेक्टला आधीच्या सरकारने दिलेल्या सवलती फडणवीस यांनी रद्द केल्या आहेत. प्रोजेक्टसाठी एका विशेष वसाहतीमध्ये 0.2 एफएसआय बहाल करणं यासारख्या अनेक इतर सवलतींचा यात समावेश आहे.
या एका तरतुदींमुळे जवळपास 30 लाख स्क्वेअर फूट अधिक जागा उपलब्ध झाली आहे. नगरविकास खात्याने यासंदर्भातली अनियमितता लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचललं. त्यामुळे खुद्द भाजप आमदाराच्याच प्रोजेक्टला मोठा झटका बसला आहे. शिवाय त्यामागे काही वेगळं अंतर्गत राजकारण आहे का याचीही चर्चा सुरु आहे.

