पुणे पोलीस कोठडीतून आरोपी पळाला

पुणे पोलीस कोठडीतून आरोपी पळाला

पोलीस कोठडीतून पळालेला आरोपी नितीन म्हस्केच्या मुसक्या आवळण्यात काही तासातच पोलिसांना यश आलं आहे.

हत्येचा आरोप असलेल्या  नितीन म्हस्केला बंडगार्डनच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास त्यानं कोठडीतून पळ काढला.

ताडीवाला रोड भागात म्हस्केनं २ महिन्यांपूर्वी एक खून केला होता. त्य़ामुळे परिसरात मोठी खळबळ आणि घबराट पसरली होती.

दरम्यान, एवढ्या सहजासहजी आरोपी पसार कसा झाला, याची चर्चा रंगली होती. मात्र पुणे पोलिसांनी काही तासातच नितीन म्हस्केच्या मुसक्या आवळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *