मनसे आमदाराच्या गाडीला अपघात, ७५ लाखाच्या मुश्तान्गचा चक्काचूर

मनसे आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. डोंबिवलीत ही दुर्घटना घडली असून गाडीच्या ड्रायव्हरने वेळीच बाहेर उडी मारल्याने तो बचावला. यामध्ये पाटील त्यांच्या ७५ लाखांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. राजू पाटील हे कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत मनसेला राजू पाटील यांच्यारुपाने एकमेव विजय मिळाला आहे. राजू पाटील हे सध्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर गेले आहेत.

गाडीचा चक्काचूर 

‘मुश्तान्ग’ ही जवळपास ७५ लाख रुपयांची गाडी होती. गाडीचा ड्रायव्हर पेट्रोल भरून येत असताना पलावा सिटी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात झाला. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट कोकण रेल्वे रुळावर कोसळली. ड्रायव्हरने गाडीतून वेळीच उडी मारल्यानं कुणालाही इजा नाही मात्र गाडीचा चक्काचूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *