बहिणीनं पळून जाऊन लग्न केल्यानं भावाची गोळी झाडून आत्महत्या

बहिणीने पळून जावून लग्न केल्याने संतापलेल्या एका भावाने बहिणीवर व तिच्या पतीवर गोळी झाडली. परंतु, ते दोघे बचावल्याने भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे.

कांदिवली विभागात एका बहिणीने उत्तर प्रदेशमधून पळून जाऊन लग्न केल्याने रागावलेल्या भावाने बहिणीची हत्या करण्यासाठी तिच्यावर आणि तिच्या पतीवर गोळी बार केल्याची घटना सोमवार रात्री घडली. त्या नंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. बटुकेश्वर त्रैलोकींनाथ तिवारी(३४) असे या भावाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी इतर रोहित सिंग या इतर जातीच्या मुलाबरोबर लग्न केल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे. सोमवारी बटुकेश्वर तिच्या बहिणीच्या घरी आला होता. त्या वेळी त्याने बहिणीवर आणि तिच्या पतीवर गोळीबार केला. परंतु यातून त्याची बहीण आणि पती घराबाहेर पळल्याने वाचले. परंतु त्यानंतर बटुकेश्वर याने स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री उशिरा पर्यंत त्याच्या बहिणीचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. युतीच्या चंदवलीमधील बटुकेश्वर रहिवासी आहे. त्याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदन साठी शताब्दी रुग्णलयात पाठवला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *