माहीममध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडला असून मृतदेहाचे तुटे करून सुटकेसमध्ये भरला असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी संध्याकाळची ही घटना असून सुटकेसमध्ये पुरुषाचा मृतदेह असल्याचं पोलिसांनी सांगितलं. माहिम दर्ग्याच्या पाठीमागे काही तरूणांना समुद्र किनारी एक सुटकेस पडलेली सापडली. सुटकेस जड लागल्याने त्यांनी खोलून पाहिले असता त्यामध्ये तुटलेले हात आणि पाय आढळले. याबाबत माहीती मिळताच माहीम पोलिस घटनास्थळी पोहचले आणि सुटकेस ताब्यात घेतली.
शीर आणि धड काहीच नसल्याने हे हात आणि पाय कुणाचे आहेत हे सांगता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे तुकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर माध्यमातून सुटकेस टाकणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहीम समुद्र किनारी काळ्या रंगाची अमेरिकन टुरिस्टर कंपनीची सुटकेस पाण्यावर तरंगताना मिळून आली. त्यात मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात व गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय तसेच, काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत कापलेले पुरुषाचे गुप्तांग आढळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
