उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस निघून गेले!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथग्रहण समारंभाला देशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शिवसेनेचा जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील हेदेखील होते. मात्र, शपथविधी सोहळ्यानंतर हे दोघे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच निघून गेल्याचे समजले.

शपथविधी पार पडल्यानंतर सर्वच नेत्यांनी उद्धव यांची भेट घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कटूता बाजूला ठेवत उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यावेळी व्यासपीठावर दिसले नाहीत. अधिक चौकशी केली असता हे दोन्ही नेते सोहळा आटोपताच तातडीने बाहेर पडल्याचे समजले. मात्र, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून उद्धव यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *