गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरमालकाचा होरपळून मृत्यू ओढवल्याची विचित्र घटना लांजा तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील गोविळ येथे झालेल्या या प्रकारामध्ये अर्धागवायू झालेले घरमालक दीपक गंगाराम गुरव यांचा मृत्यू झाला.
घरात ते (वय ५५ वर्षे) एकटेच राहत होते. सात वर्षांपूर्वी त अर्धागवायूने आजारी पडल्यामुळे मुंबईत खासगी कंपनीतील नोकरी सोडून ते गावी राहायला आले होते. त्यांचे घर वाडीपासून दूरवर आहे. आजारी असल्यामुळे ते सहसा कुठेच फिरत नसत. काठीच्या सहाय्याने फक्त घरातल्या घरात वावरत असत. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गुरव आपल्या घरातील ओटीवरील लाकडी पलंगावर झोपले होते. पलंगाच्या शेजारी बंद स्थितीत असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज गावातील लोकांनाही ऐकायला गेला.
त्यामध्ये लागलेली आग संपूर्ण घरभर पसरली. सुरवातीला ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले; मात्र आगीचे भलेमोठे लोळ आकाशाकडे झेपावताना दिसल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारामुळे मदत कार्यालयात अडथळे येत होते. घरात असलेल्या गुरव यांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले; मात्र आगीमुळे घरात घुसण्याचे धाडस झाले नाही. तोपर्यंत घर आगीत भस्मसात झाले होते. अर्धागवायूमुळे गुरव यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
आग आटोक्यात आणण्यासाठी राजापूर पालिकेचा अग्निशमन दलाचा बंब मागविण्यात आला होता. पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने बंब घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर उभा होता. या कालावधीत ग्रामस्थांनी बंबातील पाणी बदलीच्या साह्याने आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही.
स्फोट झालेला सिलेंडर घराच्या िभतीवरील लाईटच्या बोर्डखाली होता. त्यामुळे कदाचित शॉर्टसíकटमुळे हा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
