राजस्थानमध्ये मुस्लीमधर्मीय पोलिसांना दाढी काढण्याबाबत दिलेले आदेश मागे

राजस्थानातील अल्वार जिल्हा पोलिसांनी दलातील नऊ मुस्लीमधर्मीय पोलिसांना दाढी काढण्याचे आदेश दिले होते, मात्र कालांतराने हा आदेश मागे घेण्यात आला. अल्वारमधील नऊ मुस्लीमधर्मीय पोलिसांना गुरुवारी दाढी काढण्याचे आदेश देण्यात आले होते. दाढी काढल्यास ते नि:पक्षपाती दिसतील आणि तशी कृतीही करू शकतील, असे आदेशात म्हटले होते. मात्र याबाबतचे वृत्त पसरताच शुक्रवारी अल्वारच्या पोलीस अधीक्षकांनी स्वत:च जारी केलेला आदेश मागे घेतला. यापूर्वी ३२ मुस्लीमधर्मीय पोलिसांना दाढी वाढविण्याची मुभा देण्यात आली होती. गुरुवारी नऊ पोलिसांना दाढी काढण्याचे आदेश देण्यात आले होते, तर उर्वरित २३ जणांना दाढी ठेवण्याची अनुमती देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *