काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या शबरीमला यात्रेत मंगळवारी एका १२ वर्षीय मुलीला यात्रेत पुढे जाऊन भगवान अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलं. न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सध्याच्या निकालानुसार २०१८ मधील निर्णयाला स्थगिती नसल्यामुळे कायदेशीररित्या सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात जाण्याची परवानगी आहे. पण, वास्तवात मात्र वेगळंच चित्र समोर येत आहे.
मुळची पुदुच्चेरी येथील असणारी ही मुलगी एका चमूसह तिच्या वडिलांच्या साथीने दर्शनासाठी पुढे जात होती. तेव्हाच तिला मंगळवारी ११ वाजण्याच्या सुमारास महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पंबा येथील नियंत्रण कक्षापाशी अडवल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य मंदिरापासून पाच किमी दूर, यात्रेतील डोंगराळ भागाच्या टप्प्याच्या प्रवेशाजवळच हे नियंत्रण कक्ष आहे.
काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या शबरीमला यात्रेत मंगळवारी एका १२ वर्षीय मुलीला यात्रेत पुढे जाऊन भगवान अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलं. न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सध्याच्या निकालानुसार २०१८ मधील निर्णयाला स्थगिती नसल्यामुळे कायदेशीररित्या सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात जाण्याची परवानगी आहे. पण, वास्तवात मात्र वेगळंच चित्र समोर येत आहे.
मुळची पुदुच्चेरी येथील असणारी ही मुलगी एका चमूसह तिच्या वडिलांच्या साथीने दर्शनासाठी पुढे जात होती. तेव्हाच तिला मंगळवारी ११ वाजण्याच्या सुमारास महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पंबा येथील नियंत्रण कक्षापाशी अडवल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य मंदिरापासून पाच किमी दूर, यात्रेतील डोंगराळ भागाच्या टप्प्याच्या प्रवेशाजवळच हे नियंत्रण कक्ष आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही १२ वर्षीय मुलीला यात्रेदरम्यान अडवल्य़ाचं वृत्त पोलिसांनी झुगारुन लावलं आहे. याविषयी त्यांनी कोणतंही अधिकृत वक्तव्यही केलेलं नाही. पण, मंदिराच्या नियमांनुसार १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश नसल्याची बाब मात्र त्यांच्याकडून अधोरेखित करण्यात आली.