बँक (PMC Bank) प्रकरणाचा मुद्दा संसदेत हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. खातेधारकांना त्यांचे हक्काचे पैसे काढता येत नाही. अनेकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. काहींना औषध तसेच शाळा, महाविद्यालय शुल्क भरताही आलेले नाही. या मुद्द्यावरुन संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी राज्यसभेत लेखी निवेदन दिले. ग्राहक पीएमसी बँकेतून एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात.
अर्थमंत्र्यांच्या निवेदनानुसार जर एखाद्या ग्राहकाला वैद्यकीय, शिक्षण, विवाह आणि रोजच्या भाकरीसाठी पैसे हवे असतील तर तो एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतो. सध्या पीएमसी बँकेचे (PMC Bank) ग्राहक सामान्य परिस्थितीत ५०,००० रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. या मर्यादेपासून सुमारे ७८ टक्के ग्राहकांना फायदा झाला आहे. कारण त्यांचे पैसे ५०,००० पेक्षा कमी आहेत.
आरबीआयच्या चौकशीत असे दिसून आले आहे की पीएमसी बँकेने एचडीआयएलला ६,२२६ कोटी रुपये दिले होते, त्यापैकी केवळ ४३९ कोटी रुपये आरबीआयला देण्यात आले होते, बाकीचे लपविण्यात आले होते. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
