दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात; नामदेव महाराजांच्या वंशजांचं निधन

दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झालं आहे.

संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरवरून आळंदीला जात असताना त्याला आज सकाळी अपघात झाला. ही पालखी दिवेघाटात असताने जेसीबी अचानक या पालखीत घुसली. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी अशी निधन झालेल्यांची नावं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *