मोटोरोलाने आपला Moto Razr 2019 हा फोल्डेबल फोन लाँच केला आहे. हा फोन फर्स्ट जनरेशन मोटो रेझरपेक्षा प्रत्येक बाबतीत पुढे असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने आकर्षक अशा फोल्डेबल डिस्प्ले डिझाईनमध्ये हा फोन लाँच केला. सध्या अनेक फोल्डेबल फोन लाँच होत आहेत. पण यापेक्षा हा फोन वेगळा दिसतो. या फोनचा वेगळेपणा म्हणजे हा व्हर्टिकली फोल्ड होतो. फर्स्ट जनरेशन मोटो रेझरला लक्षात ठेवतच हा फोन डिझाईन करण्यात आला आहे. अमेरिकेतील एका इव्हेंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला. अमेरिकेत या फोनची किंमत १४९९ डॉलर आहे.
