खिलाडी अक्षय कुमारला दुखापत

फिटनेसचा विषय निघाला की, खिलाडी अक्षय कुमारचं नाव हमखास घेतलं जातं. वर्षभरात अक्षयचे सर्वाधिक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत तर काही प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या अक्षय मुंबईत आगामी ‘सूर्यवंशी’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाची शूटिंग सुरु असताना अक्षय कुमार सेटवर जखमी झाल्याचं कळतंय. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली असली तरीही त्यानं चित्रीकरण थांबवलं नाही. याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी अक्षयला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *