बीडजवळ ट्रक-बोलेरोच्या धडकेत सात ठार, तीन जखमी

बोलेरो आणि ट्रकच्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यात तीन जणांची प्रकृती गंभीर असून, मृतांमध्ये दोन महिलांसह एका बाळाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील वैद्यकिन्ही येथे ही घटना घडली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघातातील मृत्यू पावलेले सर्वजण निवडुंगवाडीचे रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळी बोलेरो गाडीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *