बोरघाटात चालकाचा ताबा सुटल्यानं बस दरीत कोसळून ४ जण

मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात चालकाचा ताबा सुटल्यानं बस दरीत कोसळून ४ जण ठार तर तीस प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्यासह दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

कराडहून मुंबईकडे जाणाऱ्या या बसवरील चालकाचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास ताबा सुटला आणि थेट ही बस दरीत जाऊन कोसळली. या अपघातात जखमी झालेल्या तीस प्रवाशांना कामोठेच्या एमजीएम, खोपोली रुग्णालय, पवना रुग्णालय आणि लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

झाडावर ही बस अडकल्याने अपघात टळला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती समोर येत नाही पण पोलीस बस कंपन्यांकडून माहिती गोळा करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *