डेंग्यूचा कहर, 15 दिवसात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त

तेलंगणामध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळतो आहे. डेंग्यूने एक संपूर्ण कुटुंब उद्धवस्त केलं आहे. या कुटुंबात फक्त आता एक लहान चिमुकला वाचला आहे. मुलाची आई, वडील, बहिण आणि आजोबा यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणाच्या मंचेयिरयल जिल्ह्यातील एक कुटुंब १५ दिवसात संपलं. बुधवारी १८ वर्षाच्या महिलेचा मुलाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला.

कुटुंबात सगळ्यात आधी महिलेचे पती ३० वर्षीय जी. राजगट्टू यांना डेंग्यू झाला होता. मंचेरियल जिल्ह्यातील श्रीश्री नगरमध्ये हे कुटुंब राहतं. डेंग्यूची साथ असल्याने हे कुटुंब करीमनगर येथे शिफ्ट झालं. पण उपचारादरम्यान १६ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. राजगट्टू येथील ७० वर्षी आजोबा यांना डेंग्यू झाला. त्यानंतर २० ऑक्टोबर दुसऱ्या सदस्याचा मृत्यू झाला.

कुटुंबातील २ जणांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळला असतानाच राजगट्टू यांची ६ वर्षाची श्री वर्षिनी हिचा डेंग्यूने मृत्यू झाला. उपचारादरम्यान दिवाळीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला श्री वर्षिनीचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *