वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सानिया मिर्झाला दंड

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सानिया मिर्झाला दंड

नियम सर्वांना सारखेच असतात, हे टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या घटनेवरुन समोर आलं आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी टेनिस स्टार सानिया मिर्झाला दंड ठोठावण्यात आला आहे.

सानिया मिर्झाच्या कारच्या नंबर प्लेटमुळे वाहतुकीचे नियम मोडत असल्याचं सांगत हैदराबाद पोलिसांनी सोमवारी तिच्याकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला.

पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, सानियाच्या कारच्या नंबर प्लेटचा फॉरमॅट हा ट्रॅफिक पोलिसांच्या नियमाप्रमाणे नव्हता आणि त्यामुळे पावती फाडली.

जुबली हिल्स परिसरात वाहनांची तपासणी करत असताना, सानियाने वाहतुकीचे नियम मोडल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, सानियाने नुकतंच विम्बल्डन महिला दुहेरीचं जेतेपद जिंकलं असून ती तेलंगणा राज्याची ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *