नागपुरात पोलिसांकडून गुंडाची रस्त्यावर परेड, कोट्यवधींची संपत्ती जप्त

नागपुरातील गुंड संतोष आंबेकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील संपत्तीही जप्त करण्यात आली. ही संपत्ती पाहून साऱ्यांचेच डोळे पांढरे झालेत. या संपत्तीत अनेक आलिशान गाड्या आणि बाईकचाही समावेश आहे.

फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आंबेकरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या आणि त्याच्या साथिदारांकडून तब्बल पाच कोंटींहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली. यात पाच महागड्या गाड्या, २ बाईक्स, चांदीचं सिंहासन आणि रोकड याचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गजानन साजमाने यांनी दिलीय.

आंबेकरचा धाक कमी व्हावा म्हणून पोलिसांनी त्याला न्यायालयात नेताना त्याची रस्त्यावरुन परेडच काढली. यानंतर आंबेकरविरुद्ध अनेक जणांच्या तक्रारी पोलिसांत येत आहेत. पोलिसांच्या या कारवाईबाबत सामान्यांनी समाधान व्यक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *