व्यवसाय राज्यात ढगाळ वातावरण; दिवाळीवर पावसाचे सावट By office vilaspawar 25/10/2019 राज्यात दिवाळीच्या सणावर पावसाचे सावट कायम आहे. राज्यातील काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली असून ढगाळ वातावरण कायम आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.