वेरूळ येथे पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

वेरूळ येथील पार्श्वनाथ मंदिर रस्त्याच्या जवळील पाण्याच्या डोहामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अमोल बाबासाहेब भुसारे (वय २२ रा. टोकी, ता. गंगापूर) असे त्याचे नाव आहे. अमोल पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत वेरूळ येथील पोलिस पाटील रमेश ढिवरे यांनी घटनेची खुलताबाद पोलीस ठाण्यात माहिती दिली. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक कांबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *