मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखरे सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
पेंढारकर यांनी अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवला.
दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर ही पेंढारकर यांची प्रमुख नाटके आहेत. तर ललित कलादर्श ही पेंढारकर यांची नाट्संस्था आहे.
भालचंद्र पेढांरकरांना नाट्य क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल विष्णुदास भावे पुरस्कार(१९७३), बालगंधर्व पुरस्कार(१९८३), केशवराव भोसले पुरस्कार(१९९०), जागतिक मराठी परिषद(१९९६), संगीत नाटक कला अकादमी(२००४), तन्वीर पुरस्कार(२००५), चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने( २००६) सन्मानित करण्यात आले होते.

