चिपळूण येथून पनवेल रेल्वे स्थानकात उतरलेल्या ठाण्यातील कदम कुटुंबीयांची पनवेल रेल्वे स्थानकात गडबडीत राहून गेलेली अडीच लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग, पनवेल लोहमार्ग पोलिसांनी प्रामाणिकपणे कदम कुटुंबीयांना परत केली आहे. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग परत मिळाल्याने कदम कुटुंबियांनीदेखील रेल्वे पोलिसांचे आभार मानले.दिघा येथील मुकुंद कंपनीजवळ रहाणारे अनंत कदम हे गणपतीनिमित्त चिपळूण येथे आपल्या गावी गेले होते. त्यानंतर कदम कुटुंबीय रविवारी ८ वाजण्याच्या सुमारास दिवा-सावंतवाडी रेल्वेने ठाण्यात उतरले होते. ठाणे लोकल पकडण्याच्या गडबडीत कदम कुटुंबीयांची अडीच लाख रुपये किंमतीचे दागिने, सहा हजारांची रोख रक्कम, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग पनवेल रेल्वे स्थानकातील बाकड्यावर राहिली. पनवेल रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांच्या हाती बॅग लागल्यानंतर त्यांनी बॅगेत सापडलेल्या कागदपत्रांवरून तत्काळ अनंत कदम यांना संपर्क साधला
