भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; २० जखमी

पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्यात डी-मार्टसमोर ट्रक आणि ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वीस जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ट्रकला मागील बाजूनं येणाऱ्या ट्रॅव्हलनं जोरात धडका दिल्यानं ही दुर्घटना घडली. बसमधील सर्व प्रवासी हे कर्नाटक राज्यातील असल्याचा अंदाज आहे.अपघातग्रस्त बस पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेनं जात असताना गुरुवारी पहाटे हा अपघात झाला. ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं प्राथमीक वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *