कुलाब्यात तीन वर्षाच्या मुलीचा नरबळी

 मुंबईतला कुलाबा परिसर हा उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. पण याच उच्चभ्रू परिसरात एका तीन वर्षांच्या मुलीचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी कुलाब्यातील इमारतील्या सातव्या मजल्यावरून पडलेल्या शनाया हाथीरामाणी या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात होता असं तपासात स्पष्ट झाले आहे.

आरोपी अनिल जुगाणी यानं नरबळीच्या उद्देशानं शनायाची हत्या केल्याचं स्पष्ट झालंय. आरोपी अनिल चुगाणी हा मोरक्कोत वास्तव्याला होता. सहा महिन्यापूर्वीच तो भारतात परतला होता. मोरक्कोत जुबेदा नावाच्या महिलेनं त्याच्यावर जादुटोणा केला होता. या जादुटोण्यातून बाहेर यायचं असेल तर दोन जुळ्या मुलांचा नरबळी द्यावा लागेल असं अनिलला सांगितलं गेलं होतं. अनिल मुंबईत आल्यानंतर सातत्यानं त्याच्या डायरीत दोन जुळ्यांची हत्या कर, जेलमध्ये जा आणि स्वतःला वाचव असं लिहीत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *