निवृत्त कॅप्टन अरुण कार्नाड यांचे निधन

भारतीय लष्करातील निवृत्त कॅप्टन अरुण रामकृष्ण कार्नाड यांचे वयाच्या ७१व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवारी वसईत निधन झाले. अरुण कार्नाड हे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे पुतणे, तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रमोद कार्नाड यांचे थोरले बंधू होते.

कप्तान अरुण हे पंचवटी नाका वसई पश्चिम येथे राहत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना गेल्या आठवड्यात बंगलीच्या कार्डिनल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना विरारच्या संजीवनी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी महापौर राजीव पाटील, सभापती वृन्देश पाटील, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, कोमसाप वसई शाखेचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांसह राजकीय, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, विवाहित मुलगा आशिष व सून असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *