जगात सर्वात लोकप्रिय भारतीय लष्कर

जगात सर्वात लोकप्रिय भारतीय लष्कर

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर सीआयए, एफबीआय, एनएएसए इतकंच नाही तर पाकिस्तानी लष्करासह अनेक परदेशी सरकारी संस्थांना धोबीपछाड देऊन भारतीय लष्कर पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या यादीत शिखरावर पोहोचलं आहे.

सोशल मीडियातही भारत-पाक युद्ध

विशेष म्हणजे फेसबुकवरही भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु आहे आणि दोन्ही देशांनी जिओ लोकेशनच्या माध्यमातून एकमेकांचं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. याचा अर्थ असा की, पाकिस्तानमधील कोणीही भारतीय लष्कराचं फेसबुक पेज ओपन करु शकत नाही. तर भारतातील कोणीही पाकिस्तान सैन्याचं फेसबुक पेजपर्यंत पोहोचू शकत नाही.
सुत्राच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या ट्विटर अकाऊंटचे फॉलोअर्स 4 लाख 47 हजार आहेत. देशवासियांना भारतीय लष्कराबाबत माहिती मिळावी, यासाठी सोशल मीडिया एक चांगलं माध्यम आहे.

दोन वर्षांमध्ये लष्कराचं पेज हिट

पीटीएटीच्या रँकिंग हे कोणत्याही विशेष पेजवर किंवा त्याबाबत चर्चा करणाऱ्यांच्या संख्येच्या विश्लेषणाच्या आधारित असतं. भारतीय लष्कराचं हे यश फक्त फेसबुक पेजवरच नाही, तर सैन्याच्या अधिकृत वेबसाईटला दर आठवड्यात कमीत कमी 25 लाख हिट्स मिळतात. लष्कराने 1 जून 2013 रोजी फेसबुकवर अकाउंट सुरु केलं होतं. तेव्हापासून या फेसबुक पेजला 30 लाख ‘लाईक्स’ मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *