एकेकाळी घरातून पळून गेलेल्या आमिर खानच्या भावाचं १९ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खान तुम्हाला आठवतोय का? आमिर आणि ट्विंकल खन्नासोबत ‘मेला’ चित्रपटात झळकलेला फैजल मोठ्या पडद्यावर गायब झाला. मात्र तब्बल १९ वर्षांनी फैजल मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. फैजल लवकरच एका चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. मात्र याबद्दल भाऊ आमिर व आई झीनत यांना काहीच माहित नसल्याचं त्याने सांगितलं.

फैजल खाननं ‘प्यार का मौसम’ चित्रपटात बालकलाकार म्हणून पहिल्यांदा काम केलं होतं. त्यानंतर आमिरच्या ‘कयामत से कयामत’ तक चित्रपटात तो छोट्याशा भूमिकेत झळकला. आमिरइतकं यश फैजलच्या वाट्याला आलं नाही त्यामुळे तो बॉलिवूडपासून दूर गेला.

फैजल २००७ साली दोन दिवसांसाठी बेपत्ता झाला होता. आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्यामुळे भाऊ आमिरने नजरकैदेत ठेवल्याची तक्रार फैजलने बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी पोलिसांत नोंदवली होती. फैजल पुण्यात सापडल्यानंतर त्याला पुन्हा मुंबई आणण्यात आलं होतं. फैजलची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे यावेळी त्याच्या कुटुंबियांनी सांगितले होते पण फैजलने त्याचे सर्व नातेवाईक खोटे बोलत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *