२ मोहिमेचा आणखी एक अवघड टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पार केला आहे. चांद्रयान – २ आज सकाळी चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले आहे.
‘नियोजित वेळेनुसार, आज सकाळी ९.०४ मिनिटांनी चंद्राच्या तिसऱ्या कक्षात पोहोचले,’ असं ट्विट इस्रोने केलं आहे. चांद्रयानाचा आतापर्यंतचा प्रवास ठरल्यानुसार होत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणखी ११ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
