पोलादपूरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर चाकू हल्ला

रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर तरुणीच्या हात, चेहरा आणि पाठीवर वार करुन आरोपी तरुण फरार झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाशेजारी ही घटना घडली.

हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीला म्हाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलादपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *