एटीएम व्यवहार करताना OTP लागणार

 एटीएममध्ये वाढणारे घोटाळे लक्षात घेता कॅनरा बॅंकेने आपल्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी नवे फिचर सुरु केले आहे. ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता लक्षात घेता कॅनरा बॅंकेने दहा हजारपेक्षा जास्त रकमेवरील व्यवहारावर ओटीपी अनिवार्य केला आहे. कॅनरा बॅंकेच्या एटीएममधून दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढत असाल तर एटीएम व्यवहार करताना मोबाईल बाळगणे गरजेचे असणार आहे.

एटीएम पीनसोबत ओटीपी

देशातील कोणत्याही ठिकाणाहून झालेल्या एटीएम व्यवहारादरम्यान फोन नंबरवरील ओटीपी अनिवार्य असेल. स्टेट बॅंक देखील एटीएम व्यवहारावर OTP अनिवार्य करणार आहे. यामुळे संभावित धोके टळू शकतील असे स्टेट बॅंक ऑफ इंडीयाचे उप महाव्यवस्थापक सुरेश नायर यांनी म्हटले आहे.
याव्यतिरिक्त अन्य बॅंकाही या प्रक्रियेवर काम करत आहेत.

बॅंकेतील आर्थिक व्यवहारात फसवणुकीच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून येत असतात. पण आता कॅश काढताना ओटीपी मागितला गेल्यास असे प्रकार टाळता येणार आहेत. मोबाईलमध्ये आलेला ओटीपी तुम्हाला एटीएममध्ये रजिस्टर करावा लागणार आहे. त्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *