अडीच वर्षाच्या चिमुकलीवर रेल्वेत बलात्कार

पुणे स्टेशनवर फुटपाथवर आई, वडीलांसोबत झोपलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत रेल्वेच्या डब्यात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार मंगळवारी पहाटे पुणे स्टेशनवर घडला आहे. रेल्वे बोगीत बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या चिमुकलीला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी चिमुकलीचा मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेमुळे पुणे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आरोपीची चौकशी कसून चौकशी करत आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकातील फुटपाथवर पीडित मुलगी, आई, बाबांसोबत राहत होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अडीच वर्षाच्या मुलगी झोपली होती. त्यादरम्यान तिला कोणी तरी उचलून नेले. आणि रेल्वेच्या डब्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना बेशुद्ध अवस्थेत मुलगी आढळून आली असता. तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर या प्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *