भिवंडीत कारखान्याला भीषण आग

भिवंडीतील एका कारखान्याला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. नारपोलीतील चंदन पार्क येथे असलेल्या कारखान्यात ही आग लागली आहे. सध्या अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची नाही. परंतु लाखो रूपयांचे सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यातही भिवंडीत एका गोदामाला आग लागली होती. केमिकलच्या गोदामाला लागलेल्या या आगीत लाखो रूपयांचे सामान जळून खाक झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आसपासची सर्व गोदामं रिकामी करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *