मनसेच्या कार्यकर्त्याची आत्महत्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. प्रवीण चौगुले असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. कळवा येथील विटावा परिसरात चौगुलेच्या राहत्या घरी काल रात्री ही घटना घडली आहे.यापूर्वीही चौगुले याने तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रवीण याला आईवडील नसून त्याला दारुचेही व्यसन होते. दारुच्या नशेत हा प्रकार केला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने म्हणून प्रवीण याने आत्महत्या केल्याची जोरदार चर्चा ठाण्यात सुरु आहे. मात्र पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अशी कोणतीही बाब समोर आलेली नाही. तसेच घटनास्थळी कोणती चिठ्ठी देखील सापडली नाही अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *