नगर जिल्ह्यात मुलाने आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आई भाजली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली इथे ही घटना घडली. आरोपी सुभाष हारदेने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचं कळतं. त्याने आईकडे जेवण मागितलं होतं. मात्र जेवण देण्यासाठी गेलेल्या आईवर त्याने रॉकेल ओतलं आणि पेटवून दिलं.
या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी सुभाष हारदे याला अटक करण्यात आली आहे. तर जखमी आई प्रमिला हारदेवर नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
