वैरागडे यांचे जावई पोलिस विभागात कार्यरत आहेत. त्यांची मुलगी गर्भवती आहे.मुलीला बघण्यासाठी वैरागडे दाम्पत्य जावयाकडे आले. शनिवारी रात्री दोघे घरी होते. पांडुरंग यांनी पत्नी शकुंतला यांना कढी बनविण्यास सांगितले. मात्र, दही नसल्याने कढी बनविता येणार नाही, असे शकुंतला त्यांना म्हणाल्या. पांडुरंग यांनी दरवाजा बंद केला. शकुंतला यांना मारहाण करायला सुरुवात केली. शकुंतला यांनी आरडाओरड केली, त्यामुळे शेजारी धावले. त्यानंतर पांडुरंग यांनी चाकूने स्वतःच्या छातीवर वार केले. वेळीच शेजाऱ्यांनी त्यांना पकडले. पांडुरंग यांना मेयोत तर शकुंतला यांना खासगी इस्पितळात दाखल केले.
कढी न केल्याने पत्नीला मारहाण करीत पतीने स्वतःच्या छातीत चाकू खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना पोलिस लाइन टाकळीतील क्वॉर्टरमध्ये घडली. विशेष म्हणजे जावयाकडे हा प्रकार घडला. पांडुरंग दामाजी वैरागडे, असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत

