पंतप्रधानांच्याच शैक्षणिक पात्रतेवरुन वाद

पंतप्रधानांच्याच शैक्षणिक पात्रतेवरुन वाद

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर असे भाजपचे अनेक मंत्री शैक्षणिक पात्रतेवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर आता थेट पंतप्रधानांनाच लक्ष करण्यात येत आहे. ट्विटरवर #DegreeDikhaoPMSaab हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेण्डमध्ये आला आहे.

मोदी समर्थक आणि मोदी विरोधक यांच्यात ट्विटरवर तूफान धुमश्चक्री सुरु होती. मोदी समर्थकांनी पंतप्रधानांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी कबुली दिली असल्याची बाजू धरुन ठेवली. काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नसल्याने नसते विषय ट्विटरवर चघळले जात असल्याची टीका करण्यात आली. पदवीचा देश सांभाळण्याशी काडीमात्र संबंध नसल्याचंही म्हटलं जात होतं.

दुसरीकडे ट्विटरवरील मोदींच्या विरोधकांनी प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख नसल्याचा मुद्दा लावला होता. मोदींवरील एका जुन्या प्रोफाईलवर मोदी गुजरातच्या विद्यापीठातून एम.ए. पास असल्याचं म्हटलं आहे, तर पंतप्रधान मोदींच्या प्रोफाईलवर शैक्षणिक पात्रतेचा उल्लेखच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *