जम्मू – श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद

जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील खेरी येथे मुसळधार पावसामुळे शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती आधिकारी संजय कोतवाल यांनी दिली.

दरडी हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसाच्या संततधारेमुळे दरडी हटवण्याच्या कामात अडथळा येत आहे. मात्र संध्याकाळपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे अधिका-यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *