मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दुचाकीवरून येणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस हवालदाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेआठ च्या सुमारास उर्से टोल नाका येथे घडली आहे. सागर नेहे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेचा अधिक तपास तळेगाव पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सागर नेहे हे खारघर (नवी मुंबई) या ठिकाणाहून पुण्याच्या दिशेने दुचाकी क्रमांक (एम.एच-४६ बी.एल ८२१८) वरून जात होत होते. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उर्से टोल नाका येथे धडक दिली यात सागर यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे.

सागर नेहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. दरम्यान, द्रुतगतीमार्गावर चारचाकी वाहन यांनाच प्रवेश असून दुचाकीला प्रवेश नाही. परंतु, सागर नेहे यांना वाहतूक पोलिसांनी अडवलं नाही का? पोलीस कर्मचारी असल्याने वाहतूक पोलीस मेहरबान झाले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *